जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २८१ बाधित कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २१६ कोराना बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर- ७२, जळगाव ग्रामीण- १४, भुसावळ-३२, अमळनेर-१५, चोपडा-२०, पाचोरा-१६, भडगाव-०, धरणगाव-२२, यावल-२, एरंडोल-६, जामनेर-७, रावेर-५, पारोळा-३५, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २८१ कोराना बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४८ हजार ९९९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८४ रूग्णाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६३३ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.