जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षकांसह शासकीय अधिकाऱ्यांची रंगणार मॅच (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनतर्फे मराठा क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची प्रदर्शनीय मॅच रंगणार आहे. यासह विविध विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

 

मराठा क्रिकेट लीगमध्ये अधिकारी संघाचे नेतृत्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व खेळाडूमध्ये पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व आदी अधिकारी खेळाणार आहेत. जिल्हा एकता मराठा फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत गरजूंना हातगाड्या व ग्रामीण भागातील अभ्यासिकांना स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. ४ एप्रिल सकाळी ९ वाजता होणार आहे.

या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभाग घेतला आहे. यात जळगावात जिल्ह्यातील १४ संघ तालुकानिहाय व ३ संघ जिल्हानिहाय व ७ संघ जळगाव शहरातून सहभागी होणार आहेत. दि.१० एप्रिल रोजी अधिकारी विरूध्द पदाधिकारी असा प्रदर्शनीय सामना सकाळी ८.३० वाजता शिवतीर्थ मैदानावरआयोजन करण्यात आले आहे. अधिकारी संघाचे नेतृत्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व खेळाडूमध्ये पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व आदी अधिकारी खेळाणार आहेत.

जळगाव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनतर्फे खेळासोबतच सर्व समाजातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी ५० हातगाड्यांचे गरजू व्यक्तिंना वाटप करण्यात येणार आहे. यासोबत ५० ग्रामिण भागातील अभ्यासिकांना स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. जळगावकरांना विशेष करून युवक वर्गाला प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. या सर्व जळगावकरांनी फायदा घ्यावा तसेच ५० गरजू व्यक्तिंनी हातगाड्या मिळविण्यासाठी दर्जी फाऊंडेशन ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन जळगांव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा.गोपाल दर्जी यांनी केले. याप्रसंगी प्रविण पाटील, सागर पाटील, आदी उपस्थित होते. आभार दिपक आर्डे यांनी मानले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1181419669266220

Protected Content