जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोर्ट चौकात गणपती विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरून मंडळांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवार २८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कोर्ट चौकात गणपती विसर्जन मिरवणूकीची रांग लावण्यात येते. ही रांग अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक दिवस आगोदर लावण्यात येते. दरम्यान गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते. यात आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, गौरव साखला, गोविंद पडींत , अजय गांधीख्, सागर भिमराव सोनवणे-पहेलवान सर्व रा. जळगाव यांचा समावेश होता. दरम्यान शहर पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप घालून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, गौरव साखला, गोविंद पडींत , अजय गांधीख्, सागर भिमराव सोनवणे-पहेलवान सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडरे करीत आहे.