पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुतीमधील मतभेद रविवारी १९ ऑगस्ट रोजी समोर आले. अजित पवार यांच्या जन्मसमान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा जुन्नर तालुक्यात पोहोचली असता महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला. नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले. शासकीय कार्यक्रम घेऊनही घटकपक्षांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला.
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केले. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावल जात असल्याचा आरोप करत त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पालकमंत्र्यांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असून महायुतीशी माझा संबंध नाही असे अजित पवारांनी जाहीर करावी अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, असा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला होता.