एरंडोल प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राणेंच्या प्रतिमेला जोडे मारुन एरंडोलात निषेध करण्यात येवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी पोलीस ठाण्यात निवेदनव्दारे केली.
याप्रसंगी पारोळा तालुका प्रमुख अशोक मराठे, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, आबा महाजन ,जेष्ठ शिवसैनिक रमेश महाजन,किशोर निबालकार, प्रमोद महजन ,संजुभाऊ महाजन,आरिफ पिंजारी आदींची उपस्थिती होते