एनडीएमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे – संजय राऊत

 

मुंबई । कृषी विधेयकावरून पंतप्रधान जे सांगत आहेत, तरीही जर एनडीएमधील मित्र पक्षाचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

कृषी विधेयकावरून आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गदारोळ उडाला. या विधेयकावरून विरोधी पक्षांसह मोदी सरकारच्या मित्रांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी राजीनामा दिला. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी  एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले की, कृषी विधेयकावरून पंतप्रधान जे सांगत आहेत, तरीही जर एनडीएमधील मित्र पक्षाचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित केली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले. आम्ही एनडीएचे सर्वात जुने सहकारी होतो. इतर पेईंग गेस्ट होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

 

Protected Content