धक्कादायक : छेडखानीची तक्रार केली म्हणून ठेकेदार मोरेंचा खून !

67cfe0e2 d310 44fd bd57 674a733a934a

 

जळगाव प्रतिनिधी । सहा महिन्यापूर्वी कुटुंबातील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची तक्रार केल्यामुळे विपिन मोरे यांचा खून झाल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, बिपिन दिनकर मोरे (वय 40 रा. खेडी बुद्रुक ता.जळगाव) हे आज सकाळी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आणि कचोरी घेण्यासाठी घराबाहेर बाहेर पडले होते. त्यावेळी तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी नितीन मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. दरम्यान, मयत नितीन मोरे यांचा पुतण्या मंथन जगदीश मोरे याने दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मयत नितीन मोरे यांची पत्नी चेतना बिपीन मोरे यांची मंगलपोत अमोल सोनवणे, शंकर सोनवणे, पंकज सोनवणे यांनी मंगलपोत तोडली होती. एवढेच नव्हे तर, ही घटना घडल्यानंतर काही दिवसानंतर आमच्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी संशयित आरोपी अमोल सोनवणे, शंकर सोनवणे, पंकज सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा राग मनात ठेवून अमोल सोनवणे, अरुण सोनवणे, विशाल सपकाळे, शंकर सोनवणे, पंकज सोनवणे, नाना सोनवणे, सरोज नवे, नंदकिशोर खारे, योगेश घोलप आणि कोलते नामक व्यक्तीने काटा काढण्यासाठी आज सकाळी बिपिन मोरे यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला, असा आरोप मंथन मोरे याने केला आहे.

 

खून केल्यानंतर आरोपी नाचत होते

विपिन मोरेंचा खून केल्यानंतर घटनास्थळी सर्व संशयित आरोपी नाचत होते. असे काही प्रत्यक्षदर्शिनी नागरिकांकडून बोलले जात होते, अशी देखील माहिती मंथन मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

पंधरा दिवसांपूर्वी दिली होती धमकी

 

आठवडाभरापूर्वी आयोध्या नगरातकडून मयत मोरे यांचा शालक प्रशांत मगन मराठे (रा. धुळे) हा जात असताना यातील दोन संशयितांनी हातात कोयता घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. तर पंधरा दिवसापूर्वी संशयित आरोपी अमोल सोनवणे याने पुतण्या मंथन मोरे याला धमकावत ‘अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’, असे धमकी देऊन गेला होता, अशी माहिती देखील मंथन मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत एमआयडीसी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांचा विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content