फैजपूर प्रतिनिधी । भाजपा सरकारने 5 वर्ष आश्वासने देण्यात घालवली आहेत. सत्ताधारी स्थानिक आमदारांनी काँग्रेसच्या कार्यकाळातील कामांचे उद्घाटन केल्याचे सांगत श्रेय लाटल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या संयुक्त मेळावा येथील धनाजी नाना महाविद्यालयात झाला त्यावेळी ते बोलत होते.
वडिलोपार्जित पिढीपासून आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते- चौधरी
ते पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपासून माजी आ. शिरीष चौधरी भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु होती. मात्र आज दि. 8 ऑगस्ट रोजी संवाद यात्रा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून, माझ्या वडिलोपार्जित पिढीपासून आम्ही काँग्रेस या पक्षाच्या पायावर उभे आहेत. मी माझ्या बापाचे नाव पुसून कसा दुसऱ्या पक्षात जावु शकतो. याबद्दल मी विचार सुद्धा करु शकत नाही, असे वक्तव्य चौधरी यांनी यावेळी केले आहे.
जनसंवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन
मी मुंबईत कोणत्याही भाजपाच्या नेत्यांना किंवा भाजपाच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितले नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षात जाणार नाही. ही केवळ अफवाच आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रावेर यावल तालुक्यातील गावागावात जाऊन जनतेच्या प्रश्न व समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यातील योजना व तरुणांना या जनसंवाद यात्रेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
अल्पसंख्याकांना सावत्र वागणूक
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर ठेवाव्याचे आहे. सरकार चालवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. मात्र रावेर यावल मतदार संघात आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ही माणसे आहेच नाही जाती जमातीला सावत्र वागणूक देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, मसाका संचालक नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, नगरसेवक कलीम खामन्यार, देवेंद्र बेंडाळे, प्रा.एस.एस. पाटील, नगरसेवक मनोहर सोनवणे, जनता शिक्षण मंडळ सचिव प्रभात चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्रा.डॉ.आर.एल चौधरी, संजीव चौधरी, लिलाधार चौधरी, अलीम शेख, रसूल मेंबर, हाजी शब्बीर सेट, रहमान खाटीक, काँग्रेसचे अध्यक्ष शेख रियाज, प्रतिभा मोरे, अनिल जंजाळे, सय्यद अकील फारुकी, सय्यद जावेद जनाब, वसीम जनाब, अशोक भालेराव, शेख शाकीर यांच्यासह यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभाकर सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक केतन किरंगे यांनी केले