जळगाव प्रतिनिधी । काँग्रेस स्थापना दिनानिमित्त आज जिल्हा काँग्रेस भवनासमोर पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सलामी देवून मानवंदना देण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सेवा दलचे जिल्हाध्यक्ष राजस कोतवाल, श्रीधर चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, मनोज सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, सचिव योगेश देशमुख, नदीम काझी, पी.जी.पाटील, विष्णू घोडेस्वार, मनोज वाणी, छाया बोरडे, योगिता शुक्ल, मनोज वाणी, कैलास पाटील, विश्वनाथ शिरनाडे, जाकीर शेख, गिरीष वाणी, उमेश पाटील श्याम राणा यांची उपस्थिती होती.