Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरची जागा काँग्रेसला सुटावी; पदाधिकाऱ्यांची पक्ष निरीक्षकांकडे मागणी

मुक्ताईनगरची जागा काँग्रेसला सुटावी; पदाधिकाऱ्यांची पक्ष निरीक्षकांकडे मागणी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यांनी आज १३ ऑगस्ट मंगळवार रोजी बुलढाणा येथे काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभेच्या निमित्ताने निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली व मुक्ताईनगर विधानसभेचा निरीक्षक यांचा अहवाल सादर करण्यात आला.

सदर चर्चेमध्ये महाराष्ट्राचे पक्षनिरीक्षक खासदार रमेशजी चेन्नीथला यांच्यासोबत मुक्ताईनगर विधानसभा ही काँग्रेसला सुटली पाहिजे. यासाठी तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील, प्रदेश सदस्य डॉ. जगदीश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, युवक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजूभाऊ जाधव व जिल्हा सांस्कृतिक सेलचे उपाध्यक्ष गुलाबराव पाटील महाराज यांनी निवेदन देऊन विनंती केली की मुक्ताईनगर विधानसभा (२०) ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने 5 ते 6 वेळा लढल्यानंतर पराभव झालेला असून 2 वेळा लोकसभा रावेर लढल्यानंतर त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणून ही जागा यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा काँग्रेस पक्षाला लढवण्यासाठी सोडण्यात यावी असे निवेदन रमेश चेन्नीथला यांना देण्यात आले.


Protected Content

Play sound