मुंबई प्रतिनिधी । महाआघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले असून घटक पक्षांनाही योग्य स्थान दिले जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज दुपारीच महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार होती. मात्र ही परिषद पुढे ढकलण्यात आली. यामुळे पाच वाजता महाआघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन अद्याप घटकपक्षांचे जागावाटप अडलेले असल्यामुळे लवकरच याची घोषणा करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी चव्हाण म्हणाले की, जागा वाटपाचे सूत्र ठरले असून काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. तर घटक पक्षांनाही जागा देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी अबू आझमी, सचिन सावंत यांचीही उपस्थिती होती.