कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो पदयात्रा’बाबत बैठक संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय काँग्रेसच्या ‘भारत जोडो पदयात्रा’ संदर्भात यावल तालुका काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक यावलच्या शेतकी सहकारी संघाच्या सभागृहात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

या बैठकीला तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्याना कॉंग्रेस पक्षाच्या पदयात्राची सविस्तर मार्गदर्शनाव्दारे माहिती दिली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यात्रेची सुरुवात मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोज़ी सकाळी कोळन्हावी तालुका यावल येथून होणार असून डांभूर्णी, उंटावद, चिंचोली, कासारखेडा, नायगाव, किनगाव येथे या यात्रेचा समारोप होणार आहेपुढील कार्यक्रम पक्षाच्या वतीने लवकर जाहीर करण्यात येणार आहे.

या वेळी उपस्थितांना काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील,  मारूळचे जावेद अली जनाब, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती केतन किरंगे, कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीचे सूत्रसंचालन अमोल भिरूड यांनी केले तर आभार पुंडलिक बारी यांनी मांनले. वेळी सुनील फिरके, चंद्रकला इंगळे, जिया सर, रियाज, शशिकांत, पंचायत समितीचे माजी सदस्य सर्फरज तडवी, सय्यद इखलास, माजी नगरसेवक सय्यद युनूस, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, दहिगावचे सरपंच अजय भालेराव, माजी नगरसेवक रसूल हाजी गुलाम दस्तगीर, माजी नगरसेवक समीर मोमीन,भरत चौधरी शेख झाकीर,हेमंत चौधरी, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी शेख अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक समीर खान, डॉ. पालवे, युवक अध्यक्ष फैझान शाह, हाजी गफ्फार शाह, गुरव महाजन, गुरव सर, इम्रान पहेलवान, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, वासिम तडवी, अझहर शेख, निसार भाई, आशफक शाह, रहेमान खाटीक, रशीद मन्यार, करीम कच्छी, मुशीर शेख,विक्की गजरे,नईम शेख,उमेश जावळे, उस्मान तडवी, विनोद सोनवणे, प्रवीण सोनवणे, आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Protected Content