जयपूर वृत्तसंस्था । राजस्थानमधील काँग्रेस सरकारला १०९ आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. दरम्यान, आज पक्षाची बैठक आयोजित केली असून यात सचिन पायलट यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
राजस्थानातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमिवर, आजच्या घडामोडी अतिशय महत्वाच्या ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सहकारी आमदारांसह दिल्ली गाठल्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. मध्यप्रदेश प्रमाणेच राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा पॅटर्न समोर येण्याची शक्यता यामुळे व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाटे अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सरकारकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. याप्रसंगी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी काँग्रेस सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, राज्य विधानसभेतील तब्बल १०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यामुळे आता यावर पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमिवर, अशोक गेहलोत यांनी आज सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. याप्रसंगी सरकारला पाठींबा देणार्या अपक्ष व अन्य पक्षाच्या आमदारांची उपस्थिती राहण्याची शक्यता देखील आहे. राजस्थान विधानसभेत काँग्रेस सरकारचे १०७ एवढे संख्याबळ असून त्यांना १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचा विचार केला असता पायलट यांच्या सोबत ३० आमदारांनी राजीनामा दिला तरी काँग्रेस सरकारला धोका नसेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news