नवी दिल्ली-वृत्तसंस्था | हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत आहेत. तर जम्मू-काश्मिरात थोडी चुरस असली तरी तेथे देखील काँग्रेसची आघाडी सत्तेत येणार असल्याचे दिसून येत आहे.
हरियाणा तसेच जम्मू-काश्मीरसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली. यात पहिल्या फेरीपासूनच दोन्ही ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली. येथे 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. गेल्या दोन पंचवार्षिकपासून येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. यंदाची निवडणूक जिंकून हॅटट्रीक करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. तर काँग्रेसला सत्तेत येण्याची आस होती. या पार्श्वभूमिवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत काँग्रेसला तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे उमेदवार 31 ठिकाणी आघाडीवर होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 90 पैकी 49 जागांवर आघाडी घेतली असून भाजपचे उमेदवार 26 जागांवर पुढे आहेत.