बुलढाण्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देशातील वाढती महागाई आणि इंधनाचे वाढते दर याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी नांदुरा शहर व तालुका काँग्रेसने टाळ मृदंग वाजवून अनोखे आंदोलन केले.

खाद्यतेलाचे भाव 180 रुपये लिटर, पेट्रोल 120 रुपये लिटरच्या जवळपास आणि डिझेल शंभरी पार केली आहे एकंदरीत देशात महागाई वाढत चालली आहे सर्वसामान्य व्यक्तींना जीवन जगणे कठीण होत चालले आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी नांदुरा शहर व तालुका काँग्रेसने  सुभाष चौकात टाळ मृदंग वाजवीत ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन केले आहे. देशात वाढत चाललेली महागाई आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून सरकाराने तात्काळ प्रयत्न करावे या दृष्टिकोनातून लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस सप्ताहभर वेगवेगळे आंदोलन करणार आहे आज टाळ-मृदंग बाजून या महागाईच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन करण्यात आले.

 

Protected Content