मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा दाखल

book publication

सोलापूर वृत्तसंस्था । ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकामध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन राजकारण तापले असून शिवप्रेमी देखील संतप्त होऊन आंदोलन करत आहेत. याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखक जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर स्पष्ट झाले आणि राज्यभरात या पुस्तकाचा निषेध सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर नाराजी व्यक्त करत याचे स्पष्टीकरण मागितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडत या पुस्तकाचा निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप या तिन्ही पक्षांनी केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी जय भगवान गोयल यांच्याविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज राज्यातील विविध ठिकाणी या पुस्तकाचे तसेच लेखकाच्या छायाचित्रांचे प्रतिकात्मक दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांसह अनेकांनी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याची भावनाही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content