फोन टॅपींग प्रकरण ; चौकशीसाठी समिती गठीत  

anil deshmukh

 

मुंबई (वृत्तसंस्था) ज्यांची गेल्या पाच वर्षात सत्ता होती, त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्याबाबतच्या तक्रारीनंतर एक समिती तपासासाठी नेमण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एका मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे.

 

पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले की, फोन टॅपींग प्रकरणाच्या चौकशी समितीत श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Protected Content