यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल भुसावळ रस्त्यावील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
यावल शहराला लागुन असलेल्या यावल ते भुसावळ आणी बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर राज्य मार्गावर गेल्या अनेक दिवसापासुन रस्त्याच्या मध्यभागी विविध ठीकाणी जिवघेणे व अपघातास आमंत्रण देणारी मोठमोठी खड्डे निर्माण झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन पातळीवर या प्रश्नाचा पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसाच्या आत सदरील रस्त्यांवर पडलेले जिवघेणे खड्डे न बुजल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खुड्डयात बसुन आंदोलनाचा ईशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत खड्डे बुजण्यास सुरुवात केली आहे.
यावल ते भुसावळ व बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य महामार्गावर नियमित वावरणाऱ्या वाहनधारक व या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे व प्रसिद्धी माध्यम विशेष लाईव्ह ट्रेंड न्युजने वाहनधारकांशी निगडीत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वस्तरावरून अभार व्यक्त केले जात आहे.