दिलासादायक : जिल्ह्यात आढळले अवघे ७१ रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ७१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

तालुका निहाय आकडेवारी

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-८, अमळनेर-३, चोपडा-१४, पाचोरा-२, भडगाव-८, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण ७१ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ३०४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ३३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या १ हजार ३७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content