यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
यावल येथील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास महाराज यांच्या मंदीर समोरील हरिता सरीता नदीच्या पात्रात दसऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योगपती श्रीराम पाटील हे होते तर रावण दहन आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाळ दर्जी, जि.प. माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, मनसेचे जनहित जिल्हा संघटक चेतन अढळकर, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, प्रहारचे तुकाराम बारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, नाना बोदडे, नितिने सोनार, नईम शेख आदी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार शिरीष चौधरी यांनी सांगीतले की, दसरा विजयादशमीला आपण रावण दहन करतो तो म्हणजे असत्य वरती सत्याचा विजय, आंधारावरती प्रकाशाचा विजय आणी अन्याय वरती न्यायाचा विजय याचे प्रतिक होय. यावेळी श्री महर्षी व्यासांच्या मंदीर क्षेत्राचे सोंर्दयीकरण व विकास होण्यासंदर्भात ज्या कल्पना या ठिकाणी उपस्थितांनी मांडल्यात त्याचा निश्चित आपण शासनाकडे पाट पुरावा करू असे, आमदार चौधरी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाविस्कर यांनी मानले. शेकडो नागरीकांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या रावणदहनाच्या संपुर्ण कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, उपाध्यक्ष हेमंत येवले, अमोल दुसाने, प्रभाकर वाणी, अॅड. देवकांत पाटील, अरूण लोखंडे, बापु जासुद, कामराज घारू यांनी परिश्रम घेतले.