नुकसानग्रस्त भागात आ. मंगेश चव्हाण यांनी केली दिवसभर पाहणी

चाळीसगाव प्रतिनिधी ।  गेल्या चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे तालुक्यातील काही भागात रब्बी पिकांचे कोट्यावधींचा नुकसान झाले असून नुकसान भरपाई त्वरीत द्यावी या मागणीसह  आ. मंगेश चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.

चाळीसगाव तालुक्यात दि. २० मार्च रोजी अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका, बाजरी क्षणार्धात मातीमोल झाले असून कोट्यावधींचा नुकसान शेतकऱ्यांना पत्कारावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा या अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकसान झालेल्या भागात तालुक्यातील तरवाडे, बहाळ, टेकवाडे, बोरखेडा बु. पिराचे येथे पाहणी केली. 

यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे व महसूल – कृषी विभागाचे कर्मचारी तसेच सदर पाहणी दरम्यान  जिल्हा परिषद सदस्य अनिल गायकवाड, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, नंदकुमार पाटील यांच्यासह बहाळ येथील कैलास बोरसे, अनिल पाटील, आसिफ मणियार, गुलाब पाटील, टेकवाडे येथील सरपंच वाल्मिक पाटील, सचिन पाटील, अभिमन्यू पाटील, लक्ष्मण पाटील, भीमसिंग परदेशी, गोविंद परदेशी, ढोमणे येथील ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, सुनील पाटील, भगवान सोनवणे, बापू पाटील, तरवाडे येथील पोलीस पाटील जीवन पाटील, ज्ञानेश्वर दरेकर, नारायण गवळी, लोटन पावले, ललित मराठे, बोरखेडे बु पिराचे येथील शांताराम पाटील, राजू पाटील, अरुण पाटील, देविदास पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. 

आ. मंगेश चव्हाण यांनी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह कारभारी रामराव देवरे यांची बहाळ येथील शेवगा बाग, ज्ञानेश्वर सूर्याजी पाटील यांची बहाळ येथील केळी बाग, अनिल रमेश पाटील यांची बहाळ येथील निंबू बाग पाहणी केली. तर टेकवाडे येथील शंकर गोपीचंद भिल, झगा अर्जुन निकुंभ यांच्या घरांची पडझडची पाहणी केली. टेकवाडे येथीलच साहेबराव तुळशीराम पाटील यांच्या नुकसान झालेल्या शेवगा बागेची पाहणी देखील करण्यात आली. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा असे सुतोवाच केले.

 

Protected Content