पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळानां आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी किशोर शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांचे सह तालुक्यातील केंद्रप्रमुख, बीआरसी स्टाफ व तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांमध्ये प्रथम -जिल्हा परिषद शाळा कन्हेरे, द्वितीय- जिल्हा परिषद शाळा हिवरखेडे तृतीय- जिल्हा परिषद शाळा सावळखेडे उत्तेजनार्थ जिल्हा परिषद शाळा शेवगे तांडा यांचा नंबर आला तर खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रथम – राका मिश्र विद्यालय बहादरपुर द्वितीय- व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय पारोळा व तृतीय -अनुदानित आश्रम शाळा बोळे तांडा यांना अनुक्रमे 3 लाख, 2 लाख व एक लाखाचा चेक व ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
बक्षीस वितरणानंतर या वर्षात जास्तीत जास्त शाळांनी स्पर्धात्मक अभियानात भाग घ्यावा असे आवाहन आमदार यांनी केले. या कार्यक्रमात डॉ प्रदीप भदाने ,कवी प्रेमचंद अहिरराव व डॉक्टर अर्चना विसावे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण नऊ विद्यार्थी पात्र झाल्याने त्यांचा सुद्धा सत्कार आमदार पाटील यांचे हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकत असलेल्या 10576 मुलांना एक बूट जोड व दोन पायमोजेचा जोडी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला.