भुसावळ प्रतिनिधी । येथील मतदार संघातील भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी आज (दि.३) येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी यांच्यासोबत नगराध्यक्ष रमण भोळे, भाजप शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, शिवसेना शहराध्यक्ष बबलू बऱ्हाटे, नगरसेवक मनोज बियाणी, श्रीकांत लाहोटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.