पारोळा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध

पारोळा प्रतिनिधी । नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावंदे यांनी कामकाज पाहिले.

आरोग्य सभापतीपदी नवल चौधरी, महिला व बालकल्याण सभापती अंजली पाटील, बांधकाम सभापती रेखाबाई चौधरी, पाणीपुरवठा सभापतीपदी वैशाली संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यावेळी नगरसेवक दीपक अनुष्ठान, प्रदीप पाटिल, मंगेश तांबे, छाया पाटील, मनीष पाटील, प्रकाश महाजन, बापू महाजन, सुनीता शिरोळे, जयश्री बडगुजर, कैलास चौधरी, नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावंदे, मुख्याधिकारी ज्योती भगत, संघमित्रा संदनशिव, लिपिक सुभाष थोरात व कर्मचारी उपस्थित होते. सर्व नूतन सभापतींचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले.

Protected Content