आ. चंद्रकांत पाटील यांची महिलांच्या युनिटला भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांना माविम अंतर्गत स्थापित लोकसंचलित साधन केंद्र कार्यालयीन व्यपस्थापक व सहयोगिनी यांनी भेट घेऊन सविस्तर सीएमआरसी बाबत चर्चा करून निवेदन सादर केले व आमदारांनी कापडी पिशवी युनिट साठी मुक्ताईनगर येथे जागा व बांधकाम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सरिता कोळी, माविम जिल्हा कार्यालयाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुमेध तायडे , सी आर एम एस व्यवस्थापक मिना तडवी,आशिष मोरे,छाया चव्हाण व लेखापाल प्रमोद भालेराव जीवन पाटील व रावेर सावदा व यावल येथील सहयोगिनी माया तायडे, मंगला चौधरी, शोभा सपकाळे, शारदा पाटील, ज्योती महाजन, उज्ज्वाला जैन, आयशा तडवी , सी आर पी रेखा माळी, रत्ना माळी, वैशाली कोळी,अर्चना दुबे, संध्या मगरे, संगीता माळी, रेखा अवतारे, दिपाली जैन, रोहिणी जोगी, बेबिबाई सोनवणे, प्रतिभा बावस्कर, सुशीला पाटील आणि सुषमा लिहेकर आदींसह रावेर, सावदा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील बचत गटातील असंख्य महिलांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व महिलांशी सकारात्मक चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सर्व बचत गटांच्या प्रतिनिधींची बैठक लावून बचत गटांच्या श्रमातून साकार झालेल्या वस्तूंना बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच उन्नती कापडी पिशवी महिला बचत गट मुक्ताईनगर यांच्याप्रमाणे इतर बचत गटांकडे उत्पादनाचे मोठमोठे मशनरी व साहित्य आल्यामुळे सदरील होतकरू महिला बचत गटा प्रमाणे राज्यातील सर्वच बचत गटांकडून शालेय गणवेश (ड्रेस) घेण्यासंदर्भात शासन स्तरावरून निर्णय करण्याची मागणी देखील सरकार कडे करणार असल्याचे सांगितले.

Protected Content