Home Cities जळगाव इकरा थीम महाविद्यालयात कॉलेज-इंडस्ट्री संवाद कार्यक्रम

इकरा थीम महाविद्यालयात कॉलेज-इंडस्ट्री संवाद कार्यक्रम

0
141

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील एच. जे. थीम महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने कॉलेज-इंडस्ट्री संवाद कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अक्मे सुजान केमिकलचे व्यवस्थापक अशोक वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चाँद खान होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. मुस्ताकीम बागवान यांनी केले. विभाग प्रमुख साजिद मलक यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. इरफान शेख आणि डॉ. अमिन काझी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम उद्योग जगतातील आवश्यक कौशल्ये समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.


Protected Content

Play sound