जळगावात पुन्हा कोंबिंग ऑपरेशन;दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) आज दि. 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा शहरातील विविध भागात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले. यावेळी दोन जणांना अटक करण्यात आली तर एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे सो यांचे आदेशाने करण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जळगाव- भुसावळ रोडवरील आटोनगरमध्ये, स्ट्रीट कॉर्नर नावाच्या ढाब्यावर प्रॉव्हिशन रेड करून ढाबा चालक प्रवीण यशवंत सुरळकर यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या ढाब्यावर विना परमिट विक्री सुरु होती. याठिकाणी 480 रुपये किमतीच्या 3 tuborg कंपनीच्या बियर मिळून आल्यात.म्हणून मुंबई दारूबंदी कायदा कलम 65इ, 68, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जळगाव शहरातील तंबापुरा भागात, मच्छि मार्केट परिसरात टिपू उर्फ बहिऱ्या सलीम शेख हा हातात तलवार घेऊन फिरत असताना मिळून आल्याने त्यास अटक केली असून त्याच्यावर आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याच पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान जळगाव शहरातील खेडी शिवारात हद्दपार गुन्हेगार संदीप सुरेश सपकाळे (रा. खेडी) यास तपासले असता तो घरीच मिळून आला. संदीप हा जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असताना सुद्धा विना परवानगी घरीच मिळून आल्याने त्याचे विरुद्ध मुबई पोलीस कायदा कलम 142 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content