जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान हे खराब हवामानामुळे माघारी फिरल्याने ते गोद्री येथे येणार की नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आज गोद्री येथील बंजारा, लबाणा-नायकडा समाज महाकुंभाचा समारोप होत असून विविध मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला जमणार आहे. यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचा समावेश आहे.
दरम्यान, आज दुपारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे गोद्री येथे आगमन अपेक्षित असतांना त्खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगाव येथे पोहचू न शकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जळगाव विमानतळावर जाण्यासाठी विमानाने निघाले असतांना त्यांचे विमान आकस्मीकपणे माघारी फिरले. खराब हवामानामुळे हे घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता त्यांचा गोद्री येथील दौरा होणार की नाही ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले आहे.