योगी आदित्यनाथ यांचे गोद्री येथे आगमन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आगमन झाले असून ते गोद्री येथील महाकुंभाला संबोधित करणार आहेत.

आज गोद्री येथील बंजारा, लबाणा-नायकडा समाज महाकुंभाचा समारोप होत असून विविध मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला जमणार आहे. यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचा समावेश आहे. या अनुषंगाने युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोद्री येथे दाखल झाले आहेत.

योगी आदित्यनाथ यांचे एक वाजेच्या सुमारास गोद्री येथील हेलीपॅडवर आगमन झाले. धर्मव्यासपीठावर त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले असून लवकरच ते उपस्थितांना संबोधीत करणार आहेत.

Protected Content