पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज  तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. ही चकमक पुलवामामधील काकापोरा भागात झाली.

 

 दहशतवादी स्थानिक होतो आणि एका तीन मजली इमरतीत दडून बसलेले होते. जवानांनी स्फोटकांद्वारे ही इमारत उडवली. ज्यांनतर या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर स्फोटकं व शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे.

 दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरीक देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी नागरिकांना ताताडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content