विद्यापीठात प्राणायाम शिबीराचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित १५ दिवसीय प्राणायाम शिबिराचा समारोप शुक्रवारी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

 

कोविडच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी आणि रुग्णांच्या रोगनिवारणासाठी योगाभ्यासातील आसन, प्राणायामाचे महत्व लक्षात घेऊन या केंद्राच्यावतीने सातत्याने विविध शिबिरांचे अयोजन केले जात आहे.  १० डिसेंबर पासून सुरु झालेल्या प्राणायाम शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला. प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मु.जे. महाविद्यालयातील योग विभाग संचालक डॉ.देवानंद सोनार उपस्थित होते.  डॉ.सोनार यांनी आपल्या भाषणात योगा ही जीवनशैली असून अनुभूतीचा विषय असल्याचे सांगत योगाचे महत्व पटवून दिले. प्रा.बी.व्ही.पवार यांनी योग हा रोजच्या आचरणात आणण्याचे आवाहन केले.  केंद्राचे प्रमुख व विद्यापीठ उपअभियंता इंजि. राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.  सहभागींपैकी डॉ.सुनील पाटील व संगीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  केंद्रातील डॉ.लिना चौधरी व योग शिक्षक गौरव जोशी  यांनी प्राणायामचे प्रशिक्षण वर्ग घेतले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत गरुड, हिम्मत जाधव,  सुनील चव्हाण, भिकन पाटील, मोतीराया, भगवान साळुंखे यांनी सहकार्य केले.

Protected Content