प.वि. पाटील विद्यालयात सानेगुरुजी जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी पाटील विद्यालयात साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न करण्यात आली. साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी या वेळी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सानेगुरुजींचे गीत गायन केले तर सहज फेगडे व अनुश्री चौधरी यांनी साने गुरुजींच्या कथा सांगितल्या तर काही विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवन कार्या बद्दल माहिती सांगितली.मुख्या.रेखा पाटील यांनी भूतदया या कथेच्या माध्यमातून मुलांना प्राणीपक्षांवर साने गुरुजींनी जसे प्रेम केले तसे आपणही करावे असे सांगितले.

साने गुरुजींच्या जीवन कार्यावर तसेच त्यांच्या जीवनातील कथांवर आधारित प्रश्नमंजुषा चा कार्यक्रम घेण्यात आला इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.त्यात शाश्वत विशाल कुलकर्णी, अजिंक्य रवींद्र विसपुते, खुशी जितेंद्र खैरनार यांच्या सुखदेव या गटाने प्रथम क्रमांक मिळविला त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षिका सरला पाटील व स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे  आयोजन व सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे ,दिपाली चौधरी , योगेश भालेराव यांनी केले  तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content