जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरातील अरविंद नगर परिसरातील सत्यनारायण मुन्नालाल गौतम (वय-३२) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याचे २ सप्टेंबर रेाजी उघडकीला आले. याप्रकरणी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सत्यनारायण गौतम हे कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून २८ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून घराचे कूलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातील ४ हजाराची रोकड आणि ५० हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेला. हा प्रकार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सत्यनारायण गौतम हे घरी आले तेव्हा उघडकीला आला. याप्रकरणी गौतम यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.