शॉर्टसर्कीटमुळे बंद घराला आग; संसारोपयोगी वस्तूंसह रोकड जळून खाक !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निशाणे गावातील महिलेच्या बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवार १२ मार्च रोजी रात्री १० वाजता वाजता घडली आहे. यावेळी लागलेल्या आगीत संसारोपायोगी वस्तूंसह ३५ हजार रूपयांची रोकड असा एकूण दीड लाख रुपयांचा नुकसान झाल्याचे घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कोमल दिलीप कोळी (वय-२८, रा.निशाणे ता.धरणगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गावात शिवमहापुराण सुरू असल्याने मंगळवार १२ मार्च रोजी सायंकाळी त्या घर बंद करून शिवमहापूराण कथेला निघून गेल्या. त्यानंतर रात्री १० वाजता त्यांच्या शार्टसर्कीटमुळे घराला आग लागली. ही आग लागताच गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून आग विझविली. परंतू या आगीत महिलेच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, भांडी, कपडे आणि डब्यात ठेवलेली ३५ हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख ५० हजार रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत बुधवार १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे हे करीत आहे.

Protected Content