भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण देशात आज स्वच्छता मोहीम राबवली जात आहेत भुसावळ येथे खा.र रक्षा खडसे, आ. संजय सावकारे डीआरएम येथे पांडे व सर्व रेल्वे कर्मचारी भाजप पदाधिकारी व स्वयंसेवी संघटनांनी स्वच्छता अभियाना प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. व स्टेशन परिसर महात्मा गांधी पुतळा परिसर नहाटा कॉलेज यासह अन्य भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविले स्वतः खराट्याने कचरा स्वच्छ करण्यात आला.

भुसावळ शहरात रविवारी १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिमेंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातून सुमारे १५ टन कचरा जमा केला गेला. यात नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी देखील हिरारीने ने सहभाग घेतलेला दिसून आला. यावेळी आमदार सावकारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेली पंधरा दिवस ही स्वच्छता मोहीम संपूर्ण देशभर राबवली जात आहे, यात रेल्वे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत, आम्ही स्वतः कचरा करतो, मात्र स्वच्छतेची जबाबदारी इतरांची आहे असे वागतो. त्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची व जनजागृती करण्याची गरज आहे, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात स्वच्छतेला हवे तसे महत्त्व दिले जात नाही ते दिले गेले पाहिजे, ही मोहीम केवळ पंधरा दिवसांचीच न ठेवता कायमस्वरूपी असायला हवी यासाठी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर शक्य तितका टाळालाच पाहिजे 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरू नये असा नियम आहे या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे असेही आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.