भाजपसह असंतुष्टांची रसद मिळवली ; अत्तरदेंच्या कुटनीतीने रंगत वाढली

chandrashekhar attarde

जळगाव (प्रतिनिधी) अँटीइन्कम्बन्सीचा फायदा तसेच मतविभागणी टाळण्यासाठी भाजपसह इतर पक्षातील असंतुष्टांची रसद मिळविण्याची अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या कुटणीतीने जळगाव ग्रामीण मधील रंगत जबरदस्त वाढवली आहे. एवढेच नव्हे तर, विरोधकांची मोट बांधण्यातही अत्तरदे यशस्वी झाले आहेत.

 

चंद्रशेखर अत्तरदे यांनी युती होण्याआधीच जळगाव ग्रामीणमध्ये आक्रमकरित्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे युतीतील वातावरण तापले होते. यातून पाळधी येथील भाजपच्या नियोजित मेळावा उधळवून लावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर अत्तरदे हे दुपटीची ताकद घेऊन रिंगणात उतरले. विशेष म्हणजे युती जाहीर झाल्यानंतरही त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. एवढेच नव्हे, तर त्यांनी भाजप,संघ परिवार यांच्यासह मतदार संघातील असंतुष्टांची मने जिंकण्यात यश मिळविल्यानंतर तर, त्यांचे राजकीय बळ मोठ्या प्रमाणात वाढले. आजच्या घडीला कसलेल्या राजकारण्याप्रमाणे अत्तरदे यांनी सर्वांना आपल्या व्यासपीठावर आणण्यातही यश मिळविले.

 

आजच्या घडीला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, हभप जळकेकर महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या भाषणाच्या तोफा दररोजच धडाडताय. त्यामुळे अत्तरदे यांना राजकीय पाठबळ दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थात शेवटच्या दिवसातही अत्तरदे काही राजकीय खेळी खेळणार असल्याची चर्चा आहे.

Protected Content