शहरात आज स्वच्छता मोहीम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रीन ह्यूमन फाऊंडेशन व जेसीआय जळगावतर्फे शहराच्या सुभाष चौकात परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमांतर्गत आज रविवार, दि. २९ मे रोजी भवानी मंदिरापासून दानाबाजार परिसराच्या शेवटपर्यंत स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात जळगाव शहराचे महापौर जयश्रीताई महाजन यांनी ग्रीन ह्यूमन फॉउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले.

“कचरा इतरस्त्र न टाकता कचरा पेटीतव घंटा गाडीतच टाकावा.” असे आवाहन त्यानी याप्रसंगी नागरिकांना केले. यावेळी ग्रीन ह्यूमन फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रियांका कौराणी, उपाध्यक्षा रुपाली किरंगे, सचिव काजल सैनी, सह सचिव हितेश शिंपी, जेसीआय जळगावचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी, प्रथमेश दायमा, आशुतोष दायमा, वरुण जैन, प्रतीक सेठ, भूषण कासार, सुरज बिरला यांची उपस्थिती होती.

Protected Content