राज्यात आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची नावांची यादी जाहीर

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात राज्यसभेसाठी दोन जागांवर आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विविध राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी –

महाराष्ट्र पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना

मध्य प्रदेश – कविता पाटीदार

कर्नाटक – निर्मला सीतारामन आणि जगेश

राजस्थान – घनश्याम तिवारी यांना

उत्तर प्रदेश – सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव

देशातल्या १५ राज्यातील ५७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २१ जून ते १ ऑगस्ट यादरम्यान संपत असून या सर्व जागांसाठी शुक्रवार, दि.१० जून रोजी निवडणूक होत आहे.

Protected Content