पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार : लवकरच होईल निर्णय

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी केली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग देखील सुरू आहेत. यामुळे आता सर्व ठिकाणी पहिली ते सातवीची शाळा कधी सुरू होणार याबाबतची उत्सुकता लागून आहे. या पार्श्‍वभूमिवर आज आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलतांना याबाबत सूतोवाच केले आहे. याप्रसंगी टोपे म्हणाले की, पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बर्‍यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं मत मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्य विभागाची पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास कोणतीही अडचण नसून यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात सध्या ७००-८०० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण होण्याचा दर देखील चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

Protected Content