नांदेड । येथे लॉकडाऊन सुरू असतांनाी शीख समुदायाने मिरवणूक काढल्याने वातावरण चिघळले. यात पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून यात चार कर्मचार्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शीख समाजाच्या वतीने होळीनिमित्त दरवर्षी हल्ला बोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यावर्षी नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने मिरवणुकीला परवानगी नव्हती. तसेच संबंधित हल्ला मोहल्ला कार्यक्रम हा पूजा अर्चा करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यातील काही तरुणांनी सदर हल्ला मोहल्ला कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला न जुमानता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.
कार्यक्रम सुरु असताना निशान साहेब गेट नंबर 1 पर्यंत आलं. पण बाहेर काढण्यावरुन त्यांच्यात आपसात वाद झाला. ३०० ते ४०० मुलांनी हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले. त्यांनी पारंपरिक मार्गाने हल्लाबोल केला. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.