मानमोडी येथे प्रतिबंधीत कापूस बियाण्यांची लागवड करून सविनय कायदेभंग

a518b323 43fc 4c00 9b38 8ee4d6a94df8

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील मानमोडी येथे आज (दि.२३) शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते मधुकर पाटील यांच्या शिंदी मानमोडी रोडवरील शेतात प्रतिबंधीत HTBT कापूस बियाण्यांची लागवड करून शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा एल्गार करून सविनय कायदेभंग करण्यात आला.

 

या कार्यक्रमाची सुरवात युगात्मा शरद जोशी यांच्या प्रतिमेस गतवर्षी पिकवलेल्या HTBT कापसाच्या बोंडांचा हार अर्पण करून करण्यात आली. सदर कायदेभंग चळवळीत कडूआप्पा पाटील, माजी उत्तर महाराष्ट्र प्रमुख दगडू शेळके, जिल्हा प्रमुख शेतकरी संघटना नाना पाटील, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख ईश्वर लिधुरे, जिल्हा युवा आघाडी प्रमुख संतोष पाटील, प्रविण मोरे, पंडितराव आटाळे, प्रेमराज खडके, समाधान वाघ, आकाश पाटील, प्रज्योत पाटील, नितिन पाटील, अर्जून धांडे, किरण जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

सदर बियाण्यांवर सरकारकडून बंदी आहे, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानापासून भारतीय शेतकऱ्यांना पर्यावरणवाद्यांच्या अंधश्रद्धाळू प्रचारामुळे दुर ठेवल जात आहे. यामुळे शेतीचे उत्पादन प्रभावित होवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे शेतीतील तोटाही वाढत आहे. यावर उपाय म्हणून जनूकिय संपादित वाणांची गरज आहे, यामुळे उत्पादन खर्चात कपात होईल, सोबतच कमी वेळेत कमी पाण्यात येतील, असे बियाणे आज काळाची गरज आहेत, जी क्षमता जनूकिय संपादित बियाण्यांत आहे. अन्यथा आगामी काळात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगसुद्धा बंद पडतील. यामुळे सदर वाण शेतकऱ्यांना मिळावेत, तो शेतकऱ्यांचा हक्क आहे, हे यावेळी जतवण्यात आले. याच वेळेस शेतकरी संघटनेकडून डिजिटल इंडियाचा नारा देणारे देशाचे पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांना सुद्धा तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे, जे राष्ट्रहितार्थ असेल,अशी मागणीही करण्यात आली.

Protected Content