यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव गावात आज पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या संकल्पनेतुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने लढा देण्यासाठी पोलीस प्रशासन, गृहरक्षक दल, तालुक्यातीत पोलीस पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांच्या सहकार्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित क्षेत्रातील साकळी, दहिगाव, कोरपावली, किनगाव या गावात पथसंचलनाव्दारे जनजागृती करण्यात आली.
दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील , यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्तार तडवी, ग्राम पंचायत सदस्य शेलेन्द्र सुरेश पाटील व पी. .डी. चौधरी आदी ग्रामस्थ मंडळीने पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आदी मंडळींचे गुलाबपुष्प देवुन स्वागत केले. दहिगाव गावातील विविध प्रमुख मार्गाने कोरोना जनजागृतीसाठी पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या वतीने धव्नीफितीव्दारे नागरीकांना सुरक्षीत राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या संकल्पनेतुन काढण्यात आलेल्या या कोरोना संसर्गाविरुद्ध जनजागृती पथसंचलन मोहीमेस सर्व पातळीवरून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.