पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सायबर चोरीचे दररोज अनेक गुन्हे घडत आहेत. तरी नागरिक सायबर चोरट्यांच्या अमिषाला बळी पडतात. झटक्यात पैसे कमविण्याचे प्रलोभन नागरिकाना महागात पडत आहे. मागील २५ दिवसात वाघोलीतील नागरिकाना सुमारे ८८ लाखाचा गंडा सायबर चोरट्यानी घातला. काही जणांची तर लाखो रुपायांची फसवणुक झाली आहे.
वाघोलीतील ३२ वर्षीय तरुणाला मेसेज करून ऑनलाईन टास्क द्वारे पैसे कमाविण्याचे आमिष दाखवत १५ लाख रुपायांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ दिवसात सायबर चोरट्यांनी वाघोलीतील आठ नागरिकांना ८८ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तरुणाला ऑनलाईन टास्क जॉबवर मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष दाखविण्यात आले. टेलिग्राम अॅपवर ऑनलाईन टास्क द्वारे पैसे विविध बँक खात्यात भरण्यास सांगितले. तरुणाने १४ लाख ९९ हजार रुपये भरल्यानंतरही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेतली व लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.