Home क्राईम चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविली वृध्द महिलेची सोनसाखळी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविली वृध्द महिलेची सोनसाखळी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
116


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदीराजवळ वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्याने धुमस्टाईल लांबविल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शोभा हसमुख जाणी (वय-७०) रा. विष्णू नगर, गणेश कॉलनी, जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार २ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंदीरातून घरी जाण्यासाठी शिवकॉलनी स्टॉपवर उतरल्या. गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदीराजवळून घरी पायी जात असतांना त्यांच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आले. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मागे असलेल्या एकाने शोभा जाणी यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत तोडून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरीक जमा झाले. तोपर्यंत दोन्ही चोरटे पसार झाले होते. वृध्द महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound