चोपडा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

chopasa 123

 

चोपडा प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल चौधरी यांच्याहस्ते विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना शरश्चंद्रिका पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पनाने झाली. विज्ञान मंडळ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मनोभाव रुजविते व जिज्ञासू वृत्ती वाढून संशोधन वृत्ती वाढीस लागते, असे मत प्रा.डॉ.ए.एल चौधरी यांनी उद्घाटनपर मनोगतात मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्रा.डा.डी.ए सूर्यवंशी यांनी विज्ञान मंडळामूळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात, प्रयोगांमुळे प्रत्यक्ष अनुभूती मिळून ज्ञानाचे दृढीकरण होते असे सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, प्रा.बी.एस हळपे, पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख प्रा.एस.पी पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा.बी.एस हळपे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपाली पाटील यानी तर आभार प्रा.राजश्री निकम यांनी मानले. प्रा.आर.आर बडगुजर, प्रा.आर.आर.पवार, प्रा.पी.व्ही.पाटील, प्रा.एस.आर.पाटील, प्रा.सुवर्णा बाविस्कर, एच.एम.पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content