चोपडा प्रतिनिधी । आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात दोन कोटींच्या लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच एक कोटीचे तालुका क्रीडा संकुल बांधण्यासाठी भूमिपूजन तसेच वाल्मिक नगर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे ,रामपुरा येथे सामाजिक सभागृह बांधणे, पाटीलगढी परिसरात सामाजिक सभागृह बांधणे या कामांचे देखील भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी नगरसेविका लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी नगरसेवक शामकांत सोनवणे, नाना भाऊ सोनवणे यांची उपस्थिती होती. यासोबत यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहिणीताई पाटील, माजी महापौर राखीताई सोनवणे, शिवसेना उप जिल्हा संघटक दिपकसिंग जोहरी, माजी नगरसेवक शामकांत सोनवणे, माजी जि. प. सदस्य सुभाष साळुंखे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड. एस. डी. सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन ,पंचायत समिती उपसभापती एम.व्ही पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,जि. प. सदस्य हरीष पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, माजी नगरसेवक डॉ महेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, गोपाल चौधरी, तालुका क्षेत्र संघटक नामदेव पाटील, तालुका प्रमुख यावल रविंद्र सोनवणे, युवासेना प्रमुख गोपाल चौधरी, आदिवासी सेना तालुका प्रमुख प्रताप बारेला, उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, प्रविण सोनवणे, यावल युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, नगरसेवक गटनेते भैया पवार, नगरसेवक किशोर चौधरी, महेंद्र धनगर, राजाराम पाटील, प्रकाश पाटील, नगरसेविका मीनाताई शिरसाठ, संध्याताई महाजन, मनिषाताई जैसवाल, लताताई पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, शहरप्रमुख रेखाताई मराठे, पंचायत समिती माजी उपसभापती माणिकचंद महाजन, प्रताप पाटील आडगाव, विश्वासराव पाटील बिडगाव, रहीम बागवान, वसिम कुरेशी, लासुरचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रा.ए. के. गंभीर, शहर संघटक धीरज गुजराती, युवासेना संघटक बद्धु नंदु गवळी, डॉ. रोहन पाटील, शहर संघटक जगदीश मराठे, अडावदच्या सरपंच भावना पंढरीनाथ माळी, माजी पंचायत समिती सदस्य रमेश पाटील, लासुर सरपंच जनाताई माळी, वाळकी सरपंच मधुकर धनगर, संपुळे सरपंच हिरालाल पाटील, कोळंबा सरपंच मंगल बावीस्कर, विटनेर सरपंच योगेश कोळी, दिलीप पाटील, वडगाव माजी सरपंच प्रवीण कोळी, उपतालुकाप्रमुख यावल योगेश पाटील, गोरगावलेचे माजी सरपंच सुनील पाटील, वेळोदे सरपंच सुनंदा बोरसे, वराड सरपंच अनिल बारेला, वढोदा सरपंच समाधान पाटील, उपसरपंच किशोर कोळी, हातेड सरपंच ज्ञानेश्वर आहिरे, उपतालुका संघटक ललित पाटील, नागलवाडी गोपाल पाटील, उपविभाग संघटक अनुप जैन, बापू मोरे, राजू जयस्वाल, बापू बोरसे, उपशहर प्रमुख सुनील बरडिया, हरीश पवार, वासुदेव महाजन, जगदिष मराठे, माजी सरपंच चुंचाळे संजय शिंदे, विभाग प्रमुख देविदास सोनवणे, पिंप्री माजी सरपंच संजय इंगळे, उपतालुकाप्रमुख विश्वासराव पाटील, शिक्षक सेना प्रमुख चंद्रशेखर साळुंखे, संतोष महाजन मंगल इंगळे, वासुदेव महाजन रामकृष्ण महाजन, सिताराम पावरा, प्रवीण बाविस्कर निमगव्हाण, कैलास पावरा वेळोदे , यासह अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे सदस्य व शिवसैनिक तसेच युवासैनिक उपस्थित होते.