चोपडा पीपल्स को-ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार प्रदान

WhatsApp Image 2019 11 25 at 18.56.43

चोपडा, प्रतिनिधी | देशाला महासत्तेकडे घेऊन जायचे असेल तर शेतकरी व खेड्याशिवाय पर्याय नाही असे भास्कर पेरे पाटील यांनी दावा केला.  ते नाशिक येथे ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन कृषी प्रदर्शनात आदर्श जलसंवर्धन पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला शासनाचा आदर्श जलसंवर्धक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शेतकरी बांधवांना उद्देशून बोलतांना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदे येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी पुढे सांगितले की, मेहनतीशिवाय पर्याय नाही. या मेहनतीला विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार हेमंत गोडसे , माजी आमदार नितीन भोसले, आयोजक संजय न्याहारकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९ वितरण करण्यात आला. चोपडा तालुक्यात मागील २ वर्षांपासून कमी झालेले पर्जन्यमान, पाणी टंचाई यामुळे भूजल पातळी आपला निच्चांक गाठत होती. यासाठी “जल है तो कल है ” हि संकल्पना मना मनात रुजवण्यासाठी कार्य सुरु केले. संस्थेच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसानंतर सर्व नाले , शेततळे , बंधारे यात कोट्यवधी लिटर्स जलसंचय झाला. परिणामस्वरूप प्रकल्पा अंतर्गत पाण्याचा दुर्भिक्ष कमी होऊन संबंधित गावातील चाहुबाजूंना जलाशयात पाण्याचा साठा होऊन गावातील कूपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टने केलेल्या कार्याची दखल घेऊन  पुरस्कार प्रदान  करण्यात आला.  या पुरस्कारासाठी आम्हाला भारतीय जैन संघटना, गावकरी, तसेच सार्वजनिक सेवा ट्रस्टी, संचालक, सभासदाचे ,कर्मचारी यासर्वांचे सहकार्य मिळाले आहे. या पुरस्कारामुळे शासन दरबारी चोपडाचे नाव उल्लेखनीय कामात नोद झाली आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले. यावेळी मोरेश्वर प्रभाकर देसाई (उपाध्यक्ष), प्रफुल्ल किसनदास गुजराथी (ट्रस्टी), विकास कांतीलाल गुजराथी(ट्रस्टी), शिरीष दगडुसा गुजराथी (ट्रस्टी), व्ही.डी. पारीख (संचालक), मंगेश वसंत परांजपे (मॅनेजर), भारतीय जैन संघटनेचे विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया, हरीष गुजराथी (कर्मचारी) चंद्रकांत सुंगधी, अरविंद सुंगधी, शैलेश सुंगधी,राजेंद्र सुंगधी (सभासद) आदी हजर होते.

Protected Content