महिलेचा विनयभंग करणार्‍या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

चोपडा प्रतिनिधी । येथील डॉ. शेख आबीद शेख हुसेन या डॉक्टरने विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केली असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, चोपडा शहरातील जुना यावल नाका डॉ. शेख आबीद शेख हुसेन यांचे गॅलेक्सी क्लिनिक आहे. त्यांच्याकडे शहरातील एक २९ वर्षीय महिला आपल्या तीन वर्षांचा मुलाची दाढ दुखत असल्याने उपचारासाठी गेली होती, तेथे डॉ. शेख आबिद शेख हुसेन यांनी दवाखान्याचा दरवाजा बंद करून मुलाला टेबलवर बसवले व महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैरकृत्य करून विनयभंग केला, अशी फिर्याद त्या महिलेने दिली आहे.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने आरडाओरड करून लोकांना याची माहिती दिली. नंतर या महिलेने पोलीस स्थानकात फिर्याद सादर केल्यानंतर डॉक्टरविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.