चोपडा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ते घरीच विलगीकरण कक्षात आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे.

गेल्या चार, पाच दिवसांपासून त्यांना सर्दी, वास न येणे अशी लक्षणे जाणवत होती. त्यांची ऍन्टिजेन चाचणी केली असता ती “पॉझिटिव्ह’ आली असल्याची माहिती मिळाली आहे.
गुजराथी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लोकेंद्र महाजन हे उपचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वी ते यशवंतराव प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी मुंबई येथे गेले होते, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. माझ्या सान्निध्यात आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अरुण गुजराथी यांनी केले आहे.