चोपडा कृउबाचे संचालक अरूण पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

चोपडा प्रतिनिधी । भाजपाचे माजी आमदार कैलास पाटील यांचे खंदेसमर्थक तथा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरूण पाटील यांनी आमदार लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला. 

माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्यावर तालुक्यातील होत असलेला विकासावर विश्वास ठेऊन प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य एम.व्ही.पाटील. पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, प्रताप पाटील, ॲड.एस.डी.सोनवणे, तालुका संघटक सुकलाल कोळी, शहरप्रमुख नरेश महाजन, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, चोपडा साखर कारखाना संचालक भरत पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक प्रकाश राजपुत, सुनिल बरडीया, गणेश पाटील, सुनिल पाटील, नितिन पाटील, नितिन चौधरी, नंदलाल पाटील, महेंद्र पाटील, जगदीश मराठे, प्रविण जैन यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

Protected Content